Ad will apear here
Next
अश्वारूढ तूं श्रीगणेश येसी...


आमच्या गावी साखरपा (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे गणपती घोड्यावर बसून येण्याची परंपरा आहे. त्या निमित्ताने...

अश्वारूढ तूं श्रीगणेश येसी
आश्वस्त करण्या भक्तांसी ।।

कर्ता, धर्ता, हर्ताहीं असशी,
स्थैर्य रंग चित् शांती असशी;
दहा दिशांना व्यापून उरसी,
विश्वव्यापी परि बिंदूहीं होसी ।।

अश्वारूढ श्री गजानन येसी।
आश्वस्त करण्या भक्तांसी।।

ज्ञानासह विज्ञान सांगुनी,
भक्तांच्या क्षमता विस्तारुनी;
मूलाधारा आधार होऊनी,
सतर्कतेचा मोदक देसी।।

अश्वारूढ तूं भालचंद्रा येसी।
आश्वस्त करण्या भक्तांसी।।

ऋचा आरत्या सुस्वरात घुमती,
धूप दीप सदुपचार चालती,
मी पण माझें नुरवाया ओंकारा;
चतुर्दशी दिनी विसर्जित होसी ।।

अश्वारूढ तूं लंबोदर येसी ।
आश्वस्त करण्या भक्तांसी।।

साखरपा ग्रामी येसी गणराया;
पंचक्रोशीसी आशीर्वच द्याया,
नदी शिवारें तृप्त कराया,
पुनरपि, 
भादव्यात विनायकी अवतरसी।।

अश्वारूढ तूं होऊनी येसी ।
आश्वस्त करण्या भक्तांसी ।।

- अनुजा अजय केतकर

(घोड्यावरील गणपतींच्या परंपरेविषयी माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AXIGCP
Similar Posts
कोंडगावातील मोहरम : जुन्या काळातील सर्वधर्मसमभावाचे उदाहरण इथे एक विचार मनात येतो, ज्या अंगणातून श्री ग्रामदेवतेची पालखी थाटात नाचत येते, त्याच अंगणात मोहरमचा सणदेखील तेवढ्याच थाटात रंगत होता, हे त्या काळचे सर्वधर्मसमभावाचेच एक उदाहरण नव्हे का?
साखरपा-कोंडगाव परिसरातील लाकडी घोड्यांवरचे गणपती गावोगावच्या विविध परंपरांप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-साखरपा परिसरात गणेशोत्सवाची एक वेगळीच परंपरा आहे, ती म्हणजे लाकडी घोड्यांवर बसलेले गणपती. मुळात सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार, घोड्यांवर बसलेल्या गणपतीचे प्रमाणदेखील कोंडगाव-साखरपा परिसरात अधिक आहे. आणि त्यातही काही
साखरपा बाजार (कवितेचा ऑडिओ) साखरप्याच्या बाजाराचे बालपणावर मायाजाळ त्या दिवसांच्या आठवणींनी कातर होते संध्याकाळ ।। ध्रु.।। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील बाजारपेठेवर कवी सुवर्णसुत यांनी केलेली स्मरणरंजनपर कविता आणि तिचे कवीनेच केलेले सादरीकरण...
आनंदली अयोध्या सानंद भरतभूमी... आनंदली अयोध्या सानंद भरतभूमी कित्येक आहुतींची ज्वाला अनाम होमी राऊळ राघवाचे इच्छा युगायुगांची वाल्मीक जोडताती कांडे नव्या क्षणांची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language